
निवडणूक आयोगाने मतं चोरल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्याचे पुरावेही राहुल गांधी यांनी दिले होते. आता निवडणूक आयोगाने बिहारची डिजिटल मशीनने वाचता येईल अशी मतदारांची यादी हटवली आहे. त्याऐवजी स्कॅन केलेली यादी अपलोड केली आहे. यावरून निवडणूक आयोग काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
एक बातमी शेअर करून आदित्य ठाकरे म्हणाले की, सारं जग आश्चर्यचकित होऊन पाहतंय की ज्या देशाला आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणतो त्या देशाचा निवडणूक आयोग, देशभरात निवडणूक घोटाळ्याला परवानगी दिल्याचे रंगेहात पकडलं गेल्यानंतर, आता आपली बाजू सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. निवडणूक आयोग काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
🚨 The World is watching in shock as the election commission of what we called the world’s largest democracy, is trying to scramble for cover, after being caught red handed in allowing election manipulation, pan India! 🚨
What is the EC hiding? https://t.co/DazyQB2ENL
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 10, 2025