मृत्यूपूर्वी नेमके काय दिसते; संशोधनातून मिळाली आश्चर्यकारक माहिती…

मृत्यूविषयी सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असते. जेव्हा एखाद्या व्यक्तिचा मृत्यू जवळ आला असेल, तर त्याला कोणत्या वस्तू दिसतात किंवा त्यावेळी त्या व्यक्तिच्या अंतर्मनात काय सुरू असते. याबाबत अशीच व्यक्ती माहिती देऊ शकते, ज्या व्यक्तिने मृत्यू अगदी जवळून पाहिला आहे. मृत्यूनंतर व्यक्तिला नेमके काय दिसते याविषयीची आश्चर्यकारक माहिती संशोधनातून मिळाली आहे.

‘द मिरर’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, होम केअर नर्स जुली मॅकफॅडन ही गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त वर्षे रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. ती 5 वर्षांपासून नर्सिंग होममध्ये काम करते. तिला तिच्या रुग्णालयातील रुग्णांनी मृत्यूपूर्वी त्यांना दिसणाऱ्या दृश्यांविषयी माहिती एका व्हिडियोद्वारे ही माहिती तिने संग्रही ठेवली आहे.

जुलीने सांगितले की, ‘बऱ्याचशा रुग्णांनी मृत्यूपूर्वी त्यांना दिसणाऱ्या वस्तूंविषयी सांगितले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू होईल.’ तिने याविषयी खुलासा केला आहे. रुग्णांना मृत्यूपूर्वी त्यांचे मित्र, कुटुंबिय तसेच पाळीव प्राणी दिसतात. बऱ्याचशा रुग्णांनी तिला माहिती दिली की, मृत्यूपूर्वी व्यक्तिला त्यांचे मृत नातेवाईक सांत्वन करताना दिसतात. ‘चिंता करू नको. आम्ही तुझी मदत करू. आम्ही तुम्हाला लवकरच घेऊन जाणार आहोत.’

हे सहसा रुग्णाच्या मृत्यूच्या काही दिवस आधी घडते. त्यांना मृत नातेवाईक, मृत मित्र, जुने पाळीव प्राणी दिसू लागतात तसेच आत्मा, देवदूतही त्यांना भेटण्यासाठी येतात. जे फक्त अशा व्यक्तिलाच दिसतात. ज्यांचा मृत्यू जवळ आला आहे. कधी कधी हे सगळे त्या व्यक्तिला स्वप्नातही दिसतात किंवा काही वेळा समोरही दिसतात. रुग्णांना या गोष्टींची सहसा भीती वाटत नाही, उलट त्यांना यातून खूप आराम मिळतो.