
शोरूममधून नवी कोरी गाडी बाहेर काढताना गाडीचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा वेळी वाहन विमा क्लेम मिळतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो.
नवीन गाडीचा ताबा देण्यापूर्वीच विमा पॉलिसी सुरू झालेली असते. त्याचे पैसे गाडीच्या पेमेंटसोबतच दिलेले असतात. त्यामुळे विमा पंपनी दुरुस्तीचा खर्च देते.
नव्या गाडीचा ताबा घेतल्यानंतर लगेच अपघात झाल्यास तत्काळ विमा पंपनीला कळवा, अपघाताची माहिती द्या, गाडी विकत घेतली त्या शोरूममध्येदेखील कळवा.
गाडी विकत घेतली त्या शोरूमच्या अधिकृत गॅरेजमध्येच शक्यतो गाडीची दुरुस्ती करायला न्या. अपघातग्रस्त गाडीच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी विमा पंपनी सर्व्हेअर पाठवतो.
सर्व्हेअरकडे गाडी खरेदी, विमा, नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स व इतर आवश्यक कागदपत्रे द्या. गरज असेल तर पोलीस ठाण्यात कळवून आवश्यक रिपोर्ट तयार करा.


























































