असं झालं तर… व्यायाम करूनही मान-कंबर दुखते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सकाळी जिममध्ये तासन्तास व्यायाम करूनही मान आणि कंबर आखडते किंवा दुखते. एकाच जागी बराच वेळ बसून राहणे हे त्यामागचे मुख्य कारण असू शकते.

नोकरी करणारा चाकरमानी असो किंवा व्यवसाय करणारा व्यापारी असो, ऑफिस, दुकानात कामानिमित्त तासन्तास बसावे लागते. त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही.

मीटिंग्स, मोबाईल, लॅपटॉप वापरणे, गाडी चालवणे, टीव्हीसमोर बसणे यामुळे शरीरावर स्टॅटिक लोड येतो आणि मान, खांदे, पाठ, कंबर येथील स्नायूंवर ताण येतो.

दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने रक्तपुरवठा कमी होतो, स्नायू कडक होतात, सांध्यांची हालचाल कमी होते. त्यामुळे शरीर आखडल्यासारखे वाटते आणि थकवा वाढतो.

अशा वेळी अधूनमधून खुर्चीवरून उठणे, दोन मिनिटे चालणे, हात-पाय हलवणे, मान-खांदे फिरवणे किंवा स्ट्रेचिंग करा. या हालचालींमुळे स्नायूंना आराम मिळेल.