असं झालं तर… अचानक पेन्शन थांबवली तर…

निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन दिली जाते. ही पेन्शनची रक्कम त्यांच्यासाठी खूप महत्वाची असते. जर अचानक पेन्शन थांबवली तर काय कराल.

जर तुम्हाला पेन्शनची रक्कम मिळाली नाही तर सर्वात आधी जिह्यातील बँक शाखा, पेन्शन फंड, पेन्शन कार्यालय किंवा पेन्शन विभागाशी संपर्क करा.

चालू पेन्शन का थांबवण्यात आली याची विचारणा करा. पेन्शन विभागाकडे आवश्यक कागदपत्रे
जमा करा.

पेन्शन प्रमाणपत्र, ओळख पत्र कार्यालयात जमा करा, तसेच अन्य पेन्शनधारकांशी संपर्क करून माहिती घ्या.

जर पेन्शन चुकीच्या पद्धतीने थांबवली असेल तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची लेखी तक्रार करा. कायदेशीर सल्ला घ्या.