
शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टीसी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. त्यामुळे तो व्यवस्थित असणे गरजेचे आहे, नाहीतर अडचणी निर्माण होऊ शकतात.
चौथी, सातवी, दहावी, बारावी किंवा पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला काढला जातो. तो दाखला सुस्पष्ट अक्षरात असावा.
जर तुमच्या टीसीमध्ये खाडाखोड असेल तर तुम्हाला पुन्हा त्या शाळेत नव्या टीसीसाठी अर्ज करावा लागेल. मुख्याध्यापकाला दुरुस्ती करण्याची विनंती करा.
मुख्याध्यापकाच्या सूचनेनुसार, शाळेतील कारकून खाडाखोड दुरुस्त करतील. त्यानंतर मुख्याध्यापक टीसीवर पुन्हा सही करतील. तसेच शाळेचा शिक्का मारतील.
खाडाखोड असलेल्या टीसीवर पुढील प्रवेशासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी स्वीकारले जात नाही. त्यामुळे टीसी दुरुस्त करून घेणे महत्त्वाचे आहे.