
- नवीन पासपोर्ट काढल्यानंतर काही कालावधीनंतर त्या पासपोर्टचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. नूतनीकरण करण्यासाठी एक डेडलाईन दिली असते.
- जर दिलेली डेडलाईन पाळली नाही किंवा पासपोर्टचे नूतनीकरण करायचे विसरला तर काय करायचे. हे या ठिकाणी जाणून घेणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट नूतनीकरण ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येते. ऑफलाइन करायचे असेल तर पासपोर्ट सेवेच्या अधिकृत केंद्राला भेट द्या.
- जुन्या पासपोर्टची मूळ प्रत जवळ असणे आवश्यक आहे. पहिल्या आणि शेवटच्या पानाची प्रत, तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा.
- अपॉइंटमेंटच्या दिवशी निवडलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रात वेळेवर पोहोचा. पासपोर्टची मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे चांगले. सहा महिन्यांच्या आत नूतनीकरण करता येते.