
डोळ्यांतून सतत पाणी येणे ही एक सामान्य वाटणारी, पण दुर्लक्ष न करण्यासारखी समस्या आहे. यामागे ड्राय आय सिंड्रोम, अॅलर्जी, स्क्रीन टाइम अशी विविध कारणे असू शकतात.
जास्त वेळ स्क्रीन वापरल्याने डोळे कोरडे पडतात. त्यामुळे स्क्रीनवर काम करताना दर 20 मिनिटांनी 20 फूट लांब असलेल्या वस्तूकडे 20 सेपंद पहा.
पापण्यांवर कोमट कापडाने शेक दिल्यास तेलाच्या ग्रंथी मोकळ्या होऊन डोळे कोरडे पडण्याची समस्या कमी होते. आहारात अक्रोड, जवस किंवा माशांचा समावेश करा. डोळे वारंवार चोळू नका.



























































