असं झालं तर… सब्सक्रिप्शनचे पैसे चुकून कापले गेले तर…

  • बऱ्याचदा अनेक जण गाणे ऐकण्याचे, वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन घेत असतात. त्यासाठी पैसेही मोजत असतात.
  • सहा महिन्यांचे किंवा वर्षभराच्या सब्सक्रिप्शननंतर आपल्याला ते सब्सक्रिप्शन पुढे कायम करायचे नसते, पण तरीही सब्सक्रिप्शनचे पैसे खात्यातून कापले जातात.
  • जर तुमच्या बाबतीत असं काही झालं तर त्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत. त्याचा तुम्हाला फायदा होईल. सर्वात आधी तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले का ते तपासा.
  • खात्यातून पेमेंट ऑटोपेमुळे झाले की नाही हेही जाणून घ्या. बऱ्याचदा सब्सक्रिप्शनचे पैसे ऑटोपेमुळे कट होतात. ते सर्वात आधी तपासून घ्या.
  • कंपनीने चुकून पैसे कापले की परवानगीने, हे विचारून घ्या. ऑटोपेने कापले असेल तर सेटिंगमध्ये जाऊन ऑटोपे बंद करा. चुकून कापले असतील तर तक्रार करू शकता.