असं झालं तर… लॅपटॉप फारच स्लो झालाय असं वाटलं तर…

1 लॅपटॉप फारच स्लो झाला आहे, असं वाटत असेल तर त्यासाठी काही गोष्टी करणे गरजेच्या आहेत. बऱ्याचदा लॅपटॉपचा वेग कमी होतो. लॅपटॉप हँग-स्लो चालतो.

2 सर्वात आधी कंट्रोल पॅनलमध्ये जा. ज्या प्रोग्रामचा तुम्ही वापर करत नाही. ते अनइन्स्टॉल करा. हे प्रोग्राम बॅकग्राऊंडमध्ये सिस्टमचा वेग कमी करतात. .

3 जर तुमच्या लॅपटॉपमध्ये पुरसा रॅम नसेल तर लॅपटॉपची स्पीड कमी होऊ शकतो. त्यामुळे नेहमी 4 जीबी किंवा त्यापेक्षा जास्तीचे रॅमचे लॅपटॉप खरेदी करायला प्राधान्य द्या.

4 लॅपटॉपवर नेहमी धूळ साचते. लॅपटॉपला स्विच ऑफ करून नियमितपणे स्वच्छ करा. लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी ओल्या कपडय़ाचा वापर करू नका.

5 लॅपटॉपमधील ब्राऊझरमध्ये जाऊन कॅशे आणि कुकीजला नियमित क्लिअर करा. लॅपटॉपचा वापर संपल्यानंतर त्याला स्विच ऑफ करायला विसरू नका.