अनधिकृत होर्डिंग्ज रोखण्यासाठी काय करणार? हायकोर्टाचा पालिकेला सवाल

शहरे विद्रूप करणाऱ्या अनधिकृत बेकायदा होर्डिंग्जच्या प्रश्नावरून हायकोर्टाने अनधिकृत होर्डिंग्ज रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, असा सवाल पालिका प्रशासनाला विचारला तसेच याबाबत माहिती सादर करण्याचे सांगत याबाबत निकाल जाहीर करण्याचे संकेत दिले.

भाजप, मिंधे गटासह विविध राजकीय पक्षांकडून राज्यातील विविध शहरांत अनधिकृत होर्डिंग्ज लावली जात आहेत. त्यामुळे शहरे विद्रूप होत असून याप्रकरणी सुस्वराज्य फाऊंडेशन व इतर काही जणांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांवर आज बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.