व्हॉट्सऍपवर आता ऍनिमेटेड स्टीकर्स!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मॅसेजिंग ऍप व्हॉट्सऍप आपल्या युजर्ससाठी नेहमी वेगवेगळे फिचर्स अपडेट करीत असते. हल्ली स्टिकर्सच्या माध्यमातून संवाद साधण्याचे प्रमाण वाढल्याने व्हॉट्सऍपने स्टीकर्स पॅक लाँच केले आहे. नुकतीच याची टेंस्टिंग सुरू झाली असून युजर्सना ऍन्ड्रॉइड फोनवर 2.20.195.1 आणि आय फोनवर 2.20.70.26 हे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे.

रिपोर्टनुसार, हे स्टिकर्स तीन भागात असणार आहेत. नवीन अपडेट केलेले युजर्स हे स्टिकर्स ऍक्टिव्ह करू शकतील. कंपनीने प्लेफुल्ल पियोमारू नावाने पाहिले पॅक लाँच केले आहे. त्याची साइज 2.8 एमबी असून हे स्टिकर्स ऍनिमेटेड आहेत. फेसबुक मॅसेंजर आणि टेलिग्रामवर असे स्टीकर्स आधीपासूनच उपलब्ध आहेत. याशिवाय व्हॉट्सऍप वेब ऍपसाठी डार्क मोड, क्यू आर कोडद्वारे नंबर सेव्ह करणे, एकाचवेळी 8 जणांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे गप्पा हे देखील फिचर्स लवकरच लाँच करणार आहे.