आता 24 तासांनी ‘डिसऍपिअर’ होणार चॅट, व्हॉट्सऍपचे नवीन फीचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये खूप मेसेज येतात. या भारंभर मेसेजमुळे अनेकदा मोबाईल हँग होतो. त्यामुळे ‘डिसअॅपेरिंग फीचर’ देण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांची मर्यादा सात दिवसांची आहे. मात्र आता हे मेसेज गायब करणाऱया डिसअॅपेरिंग फीचरची वेळ कमी करून 24 तास केली जाणार आहे. येत्या काही दिवसांत अॅड्राईड, आयओएसच्या सर्व वेब किंवा डेस्कटॉपवर नवीन अपडेट दिसेल.

‘डिसअॅपेरिंग फीचर’चा सर्वात जास्त फायदा ग्रुप चॅटिंगच्या वेळी होईल. ग्रुपमध्ये अनेक जण चॅट करतात. युजर हे चॅट डिलीट करत नाहीत. त्यामुळे चॅट मेसेज भरपूर प्रमाणात साचतात. त्यामुळे व्हॉट्सअॅप हँग होतो. कधीकधी मेसेजच्या मीडिया फाईलमुळे मोबाईल फोनदेखील धिमा होतो. याआधी मेसेज डिसअॅपेरिंगसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमीनकडे नियंत्रण होते.

मात्र काही दिवसांपूर्वी यात बदल झालाय. आता आयएसओ फोनमध्ये ग्रुपमधील कोणताही मेंबर मेसेज डिसअॅपेरिंगमध्ये बदल करू शकतो. त्याहीपुढे जाऊन आता डिसअॅपेरिंग फीचर 24 तासांचा होणार आहे. व्हॉट्सअॅप वापरणे युजर्सला अधिकाधिक सोपं व्हावं यासाठी पंपनीकडून नियमित नवीन फीचर आणले जातात. डिसअॅपेरिंग फीचर हा त्याचाच एक भाग आहे.