फोन नंबर सेव्ह न करता चॅटिंग करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपवरून एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवण्याआधी संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर आधी आपल्याकडे सेव्ह करावा लागतो. मात्र, आता कंपनी लवकरच एक भन्नाट फीचर आणणार आहे. या फीचरमुळे संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर सेव्ह न करताही त्याला मेसेज, फोटो किंवा व्हॉईस मेसेजेस सहज पाठवता येणे शक्य होणार आहे. WABetainfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या 2.22.8.11 या बीटा व्हर्जनमध्ये हे अपडेट मिळणार आहे. जर तुम्ही टॅप केलेला फोन नंबर व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असेल तर प्लॅटफॉर्म तुम्हाला त्या सेव्ह न केलेल्या फोन नंबरसोबत चॅटिंग करण्याचा ऑप्शन देईल. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी या फीचरची चाचणी करत आहे. मात्र, हे फीचर युजर्सना कधीपर्यंत उपलब्ध होईल याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही.