युझर्सच्या चॅटचा मेटाडेटा व्हॉट्सअॅप यंत्रणांना देणार

WhatsApp आता दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. जगभरात व्हॉट्सअॅपचे आता 2 अब्ज युझर्स झाले आहेत. याधी 2018 पर्यंत WhatsApp चे 1.5 अब्ज युझर्स होते. दीड ते दोन वर्षात ही संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

2009 मध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅप खरेदी केले होते. WhatsApp CEO Will Cathcart यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला माहिती दिली आहे की कंपनी एन्क्रिप्शन पॉलिसीमध्ये कोणताही बदल करणार नाही. मात्र असे असले तरी गरज पडल्यास तपास यंत्रणांना युझर्सच्या चॅटचा मेटाडेटा पुरवला जाऊ शकतो.

व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसीसंदर्भात आधीही अनेक प्रश्न उपस्थित गेले आहेत. तरी देखील हिंदुस्थान हे अत्यंत लोकप्रिय अॅप असून त्याचा सर्वाधिक वापर केला जातो. हिंदुस्थानी नागरिकांना लक्षात घेऊन तसे काही फिचर देखील कंपनीने लाँच केले आहेत.

युझर्सचा वाढता प्रतिसाद बघता कंपनी नवनवीन प्रयोग करत असते. आता WhatsApp Pay अधिकृतरित्या देशात लाँच करण्यात येईल, कारण सरकारकडून त्यासाठी परवानगी देखील देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशातील काही सामाजिक संस्थांनी मात्र याला विरोध दर्शवला आहे. व्हॉट्सअॅप युझर डेटा लोकलायजेशनसंदर्भात स्पष्टता नसल्याने त्याला विरोध दर्शवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या