
जगभरात कोट्यवधी युझर्स मेसेज, फोटो, व्हिडीओ शेअरिंगसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपही आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन फीचर देण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील व्हॉट्सअॅपने नवं फीचर लाँच केले आहे. यामध्ये आता युझर्स ऑटोमॅटिक आपले मेसेज डिलीट करु शकणार आहे. त्यासोबत युझर्स मेसेज डिलीट करण्यासाठी आपल्या सोयीनुसार वेळही निवडू शकणार आहे.
व्हॉट्सअॅपने लाँच केलेल्या फीचरचे नाव Delete Messages असे आहे. या फीचरने नाव Dissapearing Message असे ठेवण्यात आले होते. हे नवे फीचर युझर्ससाठी अजून उपलब्ध झालेले नाही. या फीचरची चाणी सुरू असून लवकरच हे फीचर उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सअॅप अपडेट ट्रॅकिंग वेबसाईट WABetaInfo ने या फीचरचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमुळे युझर्समध्ये उत्सुकता वाढली आहे. हे फीचर नवीन बीट व्हर्जन डाऊनलोड केल्यावरही दिसणार नाही. हे फीचर कॉन्टॅक्ट इन्फो किंवा ग्रुप सेटिंगमध्ये दिलेले असेल. हे फीचर इनेबल करण्याचा अधिकार अॅडमिनकडे असणार आहे.

मेसेज डिलीट करण्याची वेळ
नव्या फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप युझर्सला स्वत:चे मेसेज डिलिट करण्याची सुविधा देणार आहे. ऑटोमॅटिकली डिलीट करण्यासाठी 1 तास, 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना आणि 1 वर्षाचे पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार यामध्ये वेळ निवडू शकता. ये फीचर डार्क मोजवरही काम करणार आहे.


























































