
सामना ऑनलाईन, मुंबई
क्युआर कोड फिचर आता व्हॉट्सऍपवरही वापरता येणार आहे. त्याचबरोबर व्हॉट्सऍपचे स्टेटस फेसुबकवर पाहता येईल. ऍण्ड्राईड मोबाईलसाठी लवकरच हे दोन्ही फिचर वापरता येणार आहे. WABeatinfo च्या अहवालात व्हॉट्सऍप नवीन क्यूआर कोड फिचर आणत असल्याचे म्हटले आहे. व्हॉट्सऍपच्या बिटा मॉडेलमध्ये या फिचरचा वापर करता येणार आहे. कॉन्टॅक्ट्स शेअर करण्यासाठी हे फिचर वापरता येईल. यासाठी गेल्या वर्षभरापासून व्हॉट्सऍप काही चाचण्या करीत आहे. क्युआर कोडच्या साहाय्याने येत्या काही काळात व्हॉट्सऍपवरून खरेदी-विक्रीही करता येऊ शकेल. हा फीचर क्हॉट्सऍपच्या 2.19.151 बीटा व्हर्जनमध्ये पाहता येईल.





























































