
मेटाच्या मालकीचा मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍपने ‘टेक्स्ट डिटेक्शन’ फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स एखाद्या इमेजवरील मजकूर सहज कॉपी करू शकणार आहे. सध्या आयओएस वर्जन 23.5.77 व्हर्जन अपडेट केलेले आहे. त्यांनाच या फीचर्सचा फायदा घेता येईल. लवकरच हे फीचर ऍण्ड्रॉइड यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. अलीकडेच व्हॉट्सऍपने व्हॉइस स्टेटस अपडेट हे फीचरदेखील आणले आहे. ज्याद्वारे यूजर्स 30 सेकंदाची व्हाइस नोट रेकॉर्ड करून स्टेटसला शेअर करू शकतात.