व्हॉट्सऍप होणार अधिक सुरक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल फोन हॅकिंगच्या वाढत्या घटना पाहता लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍपने नवीन अपडेटमध्ये अकाऊंट प्रोटेक्ट, डिव्हाइस व्हेरिफिकेशन आणि ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड हे तीन सिक्युरिटी फीचर्स जोडले आहेत.

व्हॉट्सऍप अकाऊंट प्रोटेक्टमुळे जेव्हा एखादा युजर आपला फोन बदलतो आणि नवीन फोनमध्ये व्हॉट्सऍप लॉग इन करतो, तेव्हा ओटीपी टाकल्यानंतर युजर्सच्या जुन्या फोनवर एक सूचना दिसेल, ज्यामध्ये युजर्सना नवीन डिव्हाइसवर स्विच करायचे आहे की नाही हे विचारले जाईल. डिव्हाइस व्हेरिफिकेशन फिचरमुळे युजर्सचे डिव्हाइस हॅक झाल्यास हे फीचर युजर्सच्या खात्याचे संरक्षण करेल. तर ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड फीचरमुळे जेव्हा तुम्ही एक्रिप्शन टॅबवर क्लिक कराल तेव्हा तुमचे चॅटिंग सुरक्षित आहे की नाही हे तुम्ही व्हेरीफाईड करू शकणार आहात.