व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठा धोका; डेटा चोरी होण्याची चेतावणी…

1161

व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बातम्या आणि अपडेटचा मागोवा घेणार्‍या वेबसाइट WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅपच्या मॉडिफिकेशन व्हर्जन विषयी चेतावणी जारी केली आहे. WABetaInfo ने ट्विट करत लिहिलं आहे की, गोपनीयता आणि सुरक्षेसाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या मॉडिफिकेशन व्हर्जन चांगला पर्याय म्हणता येणार नाही. या ट्विटद्वारे व्हॉट्सअ‍ॅपचे मॉडिफिकेशन व्हर्जन आकर्षक वाटू शकते मात्र हे सुरक्षित नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मॉडिफिकेशन व्हर्जनमुळे हॅकर्स वापरकर्त्यांना सहज आपल्या जाळ्यात फसू शकतात. तसेच बनावटी व्हॉट्सअ‍ॅप डेव्हलपर मॅन-इन-द-मिडल (एमआयटीएम) हल्ल्यातून वापरकर्त्यांचा डेटा चोरी करू शकतात. या हल्ल्याच्या मदतीने हॅकर्स सॉफ्टवेअरला एडिट करून चॅटिंगमध्ये अॅक्सिस करू शकतात. तसेच मेसेज वाचून ते एडिटही करू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या