
निस्तेज चेहरा आपला आत्मविश्वास खूप कमी करतो. म्हणूनच चेहरा तेजस्वी असल्यावर, आपल्या आत्मविश्वासातही भर पडतो. चेहऱ्यावर तजेला येण्यासाठी मध हे खूप गरजेचे आहे. मधामुळे आपल्या चेहऱ्यावर तजेला तर येतोच. शिवाय मधाचा वापर केल्यामुळे, फेशियलसारखा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येतो. म्हणूनच स्किनकेअर रुटीनमध्ये मधाचा समावेश करायला हवा.
चमकदार त्वचेसाठी, मध हे आपल्यासाठी खूपच गरजेचे आहे. काळवंडलेल्या त्वचेबरोबरीने आपल्या निस्तेज त्वचेपर्यंतच्या अनेक समस्यांवर मध फायदेशीर आहे. आपण घरच्या घरी मधाचे फेशियल देखील करू शकतो. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, दाहक-विरोधी आणि गुणधर्म असतो. यामुळे त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत होते. मुरुम आणि त्वचेची जळजळ प्रतिबंधित करते, मुख्य म्हणजे मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील आहेत.
मधाचे फेशियल करताना काय लक्षात ठेवायला हवे?
घरच्या घरी मधाचे फेशियल करताना सर्वात आधी चेहरा आणि मानेवर मध लावावे. किमान 20 मिनिटे मध लावून तसाच चेहरा सुकवावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवावा.
मधामुळे त्वचेची उघडी छिद्रे बंद करून त्वचा स्वच्छ होते. मधापासून आपण चांगला टोनरही तयार करु शकतो. प्रथम तुम्ही काकडी आणि मध घ्या. काकडी सोलून प्युरी बनवा.
काकडीच्या रसात मध मिसळा. मिश्रण एका बाटलीत घाला आणि चांगले मिसळा. कापसाच्या मदतीने हे फेशियल टोनर संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा.
मधामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेसाठी उत्कृष्ट एक्सफोलिएटर बनवतात. हे तुमच्या त्वचेचे छिद्र खोलवर साफ करण्यास मदत करते आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सारख्या समस्यांना प्रतिबंधित करते.
एका भांड्यात मध आणि पिठीसाखर टाकून नीट मिक्स करुन घ्यावे. त्यानंतर आपला चेहरा थोडासा ओला करुन घ्यावा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावावे. हळुवारपणे आपल्या मानेवरुन चेहऱ्याला नीट मालिश करावी. 5-10 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा.
(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)