
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टथ सोशल अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लक्ष्य करणारा वर्णद्वेषी एआय व्हिडीओ व्हाईटहाऊसने तडकाफडकी हटवला आहे. स्टाफच्या चुकीमुळे हा व्हिडीओ पब्लिश झाला, असे व्हाईट हाऊसने नमूद केले आहे.
हा व्हिडीओ 62 सेपंदांचा होता. 2020च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्होटिंग मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप झाला होता. त्यावरून निशाणा साधणारा हा व्हिडीओ होता. त्यात ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांना चिंपांजी माकड दाखवण्यात आले होते. ट्रम्प जंगलाचे राजा तर जो बायडेन यांच्यासह अन्य नेत्यांना अनेक प्राण्यांच्या रुपात दाखवण्यात आले होते. या पोस्टवरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ‘हा वर्णद्वेष आहे. डेमॉव्रेटिक नेत्यांनी ट्रम्प यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या. राष्ट्राध्यक्षपदावरील व्यक्तीला हे शोभत नाही’, असा संताप या प्रतिक्रियामंधून व्यक्त झाला. त्यानंतर 24 तासांच्या आत व्हाईट हाऊसने ही पोस्ट हटवली.





























































