
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरातून एक अतिशय दुर्मिळ दृश्य समोर आले आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर एक पांढरे घुबड बसल्याचे दिसून आले. श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्व भूषण मिश्रा यांनी या घुबडाचा फोटो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर अपलोड केला आहे.
View this post on Instagram
विश्वभूषण मिश्रा यांनी शेअर केलेल्या त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक कॅप्शनही लिहिले आहे. 17 ऑगस्ट रोजी शयन आरती, 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी शृंगार आरतीनंतर आज पांढऱ्या घुबड महाराजांनी सप्तर्षी आरतीमध्ये सहभागी होऊन मंदिराच्या शिखरावर त्याचे स्थान घेऊन उत्सुकता वाढवली आहे. तुम्हालाही पाहण्यासाठी हे फोटो उपलब्ध आहेत, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
पौराणिक कथेनुसार, पांढरे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन आहे. त्यामुळे ज्योतिषांच्या मते काशी विश्वनाथ मंदिराच्या सुवर्ण शिखरावर पांढरे घुबड दिसणे हे एक शुभ चिन्ह आहे. मंदिरांसारख्या पवित्र ठिकाणी घुबड दिसणे शुभ मानले जाते. याचाच अर्थ येणारा काळ हा काही शुभ संकेत घेऊन येणारा आहे, अशी मान्यता आहे.