
अयोद्धेच्या राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. मंदिरासाठी सामानम्य माणसापासून देशातील मोठ्यामोठ्या लोकांनी दान केले आहे. राम मंदिरासाठी अनेकांनी कित्येक किलो सोनं दान केले आहे. तर कोणी कोट्यावधी रुपयांची देणगी दिली. मात्र तुम्हाला माहित आहे का ? या मंदिरासाठी सर्वात मोठं दान कोणी केले आहे?

राम मंदिरासाठी सर्वात मोठं दान कथावाचक मोरारीबापू यांनी केलेले आहे. त्यांच्याकडून मंदिरासाठी 11.3 कोटी रुपये देणगी देण्यात आलेली आहे.

मोरारी बापू यांच्यानंतर राम मंदिरासाठी दुसरे दानशूर गुजरातचे हीऱ्यांचे व्यापारी गोविंदभाई ढोलकीया आहेत. ज्यांनी 11 कोटींचे दान केले आहे.

सूरतचे हिरे व्यापारी दिलीप कुमार लाखी यांनी राम मंदिरासाठी 101 किलो सोनं दान केले आहे. या सोन्याची किंमत 66 कोटी रुपये आहे.
![]()
पटणाच्या महावीर मंदिराकडून राम मंदिरासाठी 10 कोटी रुपयांचे दान आले आहे. महावीर मंदिराने 2020 पासून आतापर्यंत 2-2 लाख असे 10 कोटी रुपये देणदगी दिली आहे.

याव्यतिरिक्त पटणाच्या महावीर मंदिराकडून रामलल्लासाठी सोन्याचा धनुष्यबाण दिला आहे.

मुकेश अंबानी यांनी राम मंदिरासाठी 2.51 कोटी रुपयांचे दान केले आहे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मुकेश अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत अयोद्धेला पोहोचले होते.



























































