पोषक आहाराने सहा वर्षांत 37 लाखांना वाचवता येईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक देशांनी त्यांच्या आरोग्यसेवेत पोषक आहाराच्या समावेशाला चालना दिली तर 2025 सालापर्यंत 37 लाख जणांचे आयुष्य वाचवता येईल. पोषणमूल्य असलेल्या आहारासंदर्भातील अहवाल बुधवारी प्रकाशित करण्यात आला.

अत्यावश्यक आरोग्य सेवेच्या पॅकेजमध्ये न्यूट्रिशन्सला महत्त्वपूर्ण स्थान दिले पाहिजे. आपण सर्वांनी ‘हेल्दी डाएट’ला प्रोत्साहन देत चांगले  ‘फूड एन्व्हार्यमेंट’ तयार केले पाहिजे असे मार्गदर्शन जागतिक आरोग्य संघटनेचे सहाय्यक महासंचालक नाओको यामामोटो यांनी यावेळी केले. पोषक आहाराच्या सेवनाने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळते हे सांगताना नाओको यामामोटा म्हणाले, मूलभूत न्यूट्रिशिएशन प्रोग्रॅमवर जर एक अमेरिकन डॉलर खर्च केला तर त्याच्या मोबदल्यात 16 अमेरिकन डॉलर स्थानिक अर्थव्यवस्थेला परत मिळतात.

निरीक्षणे

  • जगातील 13 टक्के लोकसंख्या ही लठ्ठ आहे. ही आकडेवारी प्रत्येक देशात वाढती आहे.
  • पाच वर्षांखालील मुलांना पोषक आहार मिळण्याचे प्रमाण काही देशांमध्ये सुधारत आहे. अंडरवेट आणि ओव्हरवेट व्यक्तींवरील उपचाराकडेही जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष वेधले आहे.