ऐकावं ते नवलंच, कोंबड्याच्या हत्येने अख्खं शहर दुःखात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका कोंबडय़ाच्या हत्येनंतर अख्खं शहर दुःखात गेल्याचे कधी ऐकलं आहे का? पण असं घडलं आहे. अमेरिकेतील मिसिसिपी येथे शहरात ही घटना घडली आहे. चक्क आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोंबडय़ाचे नाव कार्ल होते. कार्ल खूप लोकप्रिय होता. तो कॉफी शॉपमध्ये जाऊन पाणी प्यायचा. इतकच नाही तर फिटनेस क्लासमध्येही सहभागी व्हायचा. तो लोकांसोबत फोटो काढायचा आणि शहरभर रेलिंगवर डुलकी घेताना दिसायचा. काही दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. एकप्रकारे त्याचे अपहरण झाल्याचा संशय होता. महिला पोलीस अधिकाऱ्यावर त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. कोंबडय़ाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याच्या हत्येने 18 हजार लोकसंख्या असलेले संपूर्ण शहर अस्वस्थ झालंय.

यानंतर शहरातील मुलांनी कार्लच्या स्मरणार्थ प्रेमपत्रे लिहिली आणि ती संपूर्ण शहराच्या खिडक्यांमध्ये चिकटवली. स्थानिक कलाकाराने कोंबडय़ाच्या स्मरणार्थ एक भित्तिचित्रही रेखाटले.