तुम्हांलाही डास चावतात का? मग वाचा

सामना ऑनलाईन। मुंबई

डेंग्यू, मलेरिया, झिका हे आजार डास चावल्यामुळे होतात. आजूबाजूला साठलेल्या अस्वच्छ पाण्यात या डासांची पैदास होते. हे डास चावले कि आजार जडतो. पण एका संशोधनात डास स्वत:हून आपल्याला चावायला येत नाहीत. तर २० टक्के माणसचं डासांना आकर्षित करत असल्याचे समोर आले आहे. जाणून घेऊ या अशा व्यक्तींबद्दल.

१…गडद रंगाचे कपडे डासांना आकर्षित करतात.
संशोधकांनुसार डास सरसकट सगळ्याच माणसांना कधी चावत नाहीत. तर गडद रंग व गंध त्यांचे लक्ष वेधून घेतात. यामुळे जर तुम्ही नियमित गडद रंगाचे कपडे घालत असाल जसे गडद निळा, काळा व लाल रंगाचा ड्रेस तर डास तुमच्यावर हल्ला करू शकतात. कारण हे रंग डासांना आकर्षित करतात.

२…”ओ ” रक्तगट डासांना खुणावतो
मानवी रक्त डासांसाठी अमृताचे काम करते. त्यातही डासांना मानवी रक्तातून प्रोटीन मिळते. यामुळे डासाची मादी अंडी घालण्याआधी मानवी रक्त शोषून त्यातून प्रोटीन मिळवते. तसेच काही रक्तगटही डासांना आकर्षित करतात. यात “ओ, ए,” रक्तगट असलेल्या व्यक्तींना डास सर्वाधिक चावतात. तर या तुलनेत “ब” रक्तगट असलेल्यांना डास फार त्रास देत नाहीत.

३…कार्बनडाय ऑक्साईडही डासांना आकर्षित करतो
कार्बनडाय ऑक्साईडचा गंध डासांना सर्वाधिक आकर्षित करतो. आपण श्वासोश्वास करताना ऑक्सीजन शरीरात घेतो व कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. यामुळे बऱ्याचवेळा रस्त्यावरुन किंवा एखाद्या बागेजवळून जाताना आपल्या कानाजवळ, डोक्यावर बरेच डास घोंघावताना दिसतात.

...कार्बनडाय ऑक्साईडच्या व्यतिरिक्त असेही काही घटक आहेत जे डासांना आपल्याकडे आकर्षित करतात. शरीरातून निघणाऱ्या घामात लॅक्टीक अॅसिड, युरीक अॅसिड आणि अमोनिया असतो. हे घटक डासांना आपल्याकडे आकर्षित करतात. ज्यांना खूप घाम येतो किंवा जे कष्टाची कामे करतात , जिममध्ये व्यायाम करतात अशांना डास आपली शिकार बनवतात.
तसेच सामान्य महिलांच्या तुलनेत गर्भवती महिलेच्या शरीरातून जास्त प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईड सोडले जाते. तसेच गर्भवती महिलेच्या शरीरात उष्णतेचे प्रमाणही वाढलेले असते. यामुळे अशा महिलांकडे डास आकर्षित होतात.

summary…why-do-mosquitoes-bite-some-people-more-than-others