
आपल्या आहारामध्ये जवसाचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. जवसाला सूपरफूड असेही मानले जाते. आहारात जवसाचा वापर करुन, आपल्याला विविध पोषक तत्व मिळतात. एक चमचा जवस खाल्ल्याने शरीराला 37 कॅलरीज मिळतात. यात फायबर, प्रथिने, तांबे आणि जस्त सारखे आवश्यक पोषक घटक देखील असतात. उत्तम आरोग्यासाठी भाजलेले जवस खाण्याचे सुद्धा अगणित फायदे आहेत.
भाजलेले जवस खाण्याचे फायदे
अनेकदा आपल्याला सकाळी उठल्यावर, थकल्यासारखे वाटते. अशावेळी भाजलेले जवस खाणे फायदेशीर ठरू शकते. भाजलेल्या जवसात प्रथिने जास्त प्रमाणात असतात.
जवस मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त मानलं जातं. जवसात ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड जास्त प्रमाणात असतात. यामुळे मेंदूला जलद गतीने चालना देण्यास मदत करतात. यामुळे आपली विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती वाढते.
तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर, सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा जवस भाजून घ्या. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करू शकते. नियमितपणे जवसाचे सेवन केल्यास, खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. यामुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो.
चहामध्ये पुदिन्याची पाने घातल्यावर मिळतील हे आश्चर्यचकीत करणारे फायदे
वजन कमी करायचे असेल तर प्रत्येक जेवणानंतर अळशी भाजून खा. याचे दोन फायदे होतील. पहिले म्हणजे, त्यातील प्रथिने तुमची भूक कमी करतील आणि तल्लफ टाळतील. दुसरा फायदा असा होईल की त्यातील फायबर तुमचे चयापचय गतिमान करेल आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत जलद मदत करेल. अशा प्रकारे, या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे तुम्हाला वजन नियंत्रित करण्यास मदत करतील.
बद्धकोष्ठतेची समस्या अनेकांना भेडसावते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, आपण भाजलेल्या जवसाचे सेवन करू शकतो. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
भाजलेल्या जवसात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपली त्वचा आणि केस दोन्ही निरोगी राहण्यास मदत मिळते. जवस खाण्यामुळे केवळ केसांचा पोत सुधारत नाहीत तर, केसांची वाढही होण्यास मदत होते.