
हिवाळा सुरु होताच बाजारामध्ये हिरव्यागार पालेभाज्या आपल्याला दिसू लागतात. यामध्ये कांद्याची पात आपलं लक्ष वेधून घेते. कांद्याची पात ही आयुर्वेदाच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानली जाते. कांद्याची पात संसर्गाशी लढणाऱ्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असते. मुख्य म्हणजे ही भाजी फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी देखील अतिशय उत्तम मानली जाते. हिवाळ्याच्या काळात शरीराला अंतर्गत उष्णता प्रदान करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे.
कांद्याच्या पातीमध्ये नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. म्हणूनच हिवाळ्यामध्ये ही भाजी खाणे हे अतिशय उत्तम मानले जाते.
कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढवून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
श्वसनमार्गातील जळजळ कमी करण्यास आणि फुफ्फुसातील कफ साफ करण्यास ते अत्यंत उपयुक्त आहे.
कांद्याची पात आपल्या हाडांसाठी फार उपयुक्त मानली जाते. या पातींमध्ये व्हिटॅमिन के चा उत्कृष्ट स्रोत असतो. तसेच यामुळे हाडांची घनता वाढते, त्याचबरोबर हाडांना कमकुवत होण्यापासून रोखते.
कांद्याच्या पातीमध्ये अॅलिसिन नावाचे एक शक्तिशाली संयुग असते. हे संयुग रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. नियमित सेवनाने धमन्या स्वच्छ राहण्यास मदत होते आणि हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. हे पचनसंस्थेला देखील बळकटी देते.
कांद्याची पातीपासून कोणताही पदार्थ करताना ती अधिक प्रमाणात शिजवू नये. कांद्याच्या पातीचा वापर सॅलडमध्ये किंवा सूपमध्ये करता येतो. तसेच गार्निशिंग करण्यासाठी देखील कांद्याची पात ही फार उपयुक्त ठरते.
हिवाळ्यात जेवल्यानंतर तुम्हालाही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते का?

























































