
वारंवार पैशांची मागणी करूनही पती पैसे देत नसल्याने पत्नीने दोन मुलांच्या सहाय्याने पतीचा काटा काढल्याची घटना समोर आली आहे. सुशांतो पाल असे मृताचे नाव असून ते ज्वेलरी बनवण्याचे काम करत होते. याप्रकरणी नवघर पोलिसांनी पत्नीसह मुलांना ताब्यात घेतले.
नवघर परिसरातील सोनल पार्क इमारतीमध्ये सुशांतो यांचे ज्वेलरी बनवण्याचे दुकान होते. मंगळवारी रात्री सुशांतो यांचा मृतदेह दुकानात आढळून आला. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलि सांनी तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सुशांतो यांची पत्नी अमृता पाल आणि तिच्या दोन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. पतीकडे पैसे मागूनही तो पैसे देत नसल्यामुळे हत्या केल्याचे अमृताने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अमृता आणि सुमित पाल यांना अटक केली.




























































