शेतात पाणी देत असताना अल्पवयीन मुलावर रानडुकराचा हल्ला, गंभीर जखमी

527

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथील अल्पवयीन मुलगा संभाजी शिवाजी फुलारे (17) हा शेतात ऊसाला पाणी देत असताना पळत आलेल्या रानडुकराने त्याला धडक देत खाली पाडले. अचानक झालेल्या हल्ल्याने संभाजी घाबरून गेला होता. त्यानंतर रानडुकराने त्याच्या शरीराचे अनेक ठिकाणी लचके तोडले. गंभीर अवस्थेत त्याला जालना येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार गावातील काहीजण डुकरे पकडण्यासाठी आले होते. त्यांच्या भीतीने डुक्कर संभाजी पाणी देत असलेल्या उसाच्या शेतात घुसले. तेथे संभाजी पाणी देत उभा होता, चवताळलेल्या डुक्कराने सरळ त्याच्या अंगावर जात त्याला धडक देऊन त्याच्या शरीराचे लचके तोडले. दरम्यान कोरोनाच्या भीतीने गावात सर्वत्र बंद असल्याने अनेकजण शेतात जाऊन काम करने पसंत करत आहेत. रानडुकारांच्या या हल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात कोरोना व शेतात डुकराचा हल्ला त्यात विजेचे भारनियमन त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या