
अतिथी देवो भव..! अशी संस्कृती असलेल्या हिंदुस्थानात एका परदेशी पर्यटकाची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. परदेशातून कोलकात्त्याला फिरायला येणाऱ्या पर्यटकाला कोलकात्त्यातील एका टॅक्सी ड्रायव्हरने शिवीगाळ करून जास्तीचे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ स्वत: त्या परदेशी पर्यटकाने रेकॉर्ड केला असून त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे नेटकरी संतापले आहेत.
मिस्टर डस्टिन, असे त्या परदेशी पर्यटकाचे नाव आहे. मिस्टर डस्टिन यांचे एक युट्युब चॅनल देखील आहे. डस्टिन कोलकाता येथे उतरला आणि पार्क स्ट्रीटमधील हॉटेल ग्रेट वेस्टर्नकडे जात होता. यासाठी त्याने उबरने कॅब बुक करण्याऐवजी तेथील लोकल टॅक्सी बुक केली. यावेळी त्याने कॅब ड्रायव्हरला स्पष्टपणे सांगितले की त्यांना पार्क स्ट्रीटमधील हॉटेल ग्रेट वेस्टर्नमध्ये जायचे आहे. मात्र, टॅक्सी ड्रायव्हरने त्याला विरुद्ध दिशेला घेऊन गेला. राजारहाटमधील द वेस्टर्न नावाच्या वेगळ्या हॉटेलकडे घेऊन गेला. हे हॉटेल डस्टिनच्या हॉटेलपेक्षा लांब होते.
दरम्यान डस्टिन आणि कॅब ड्रायव्हर यांच्यात 700 रुपये देण्याचे ठरले होते. मात्र कॅब ड्रायव्हर डस्टिनला चुकीच्या पत्त्यावर सोडून त्याच्या कडून अधिकचे पैसू उकळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र डस्टिनने त्याला स्पष्ट नकार दिला. “मी तुम्हाला आधी हॉटेल दाखवले होते. आणि तुम्ही ते मान्यही केले आणि मग तुम्ही मला चुकीच्या हॉटेलमध्ये घेऊन गेलात. त्यामुळे मी अधिकचे पैसे देणार नाही, असे डस्टिनने कॅब ड्रायव्हरला सांगितले. यावेळी कॅब ड्रायव्हरने आपली चूक मान्य केली पण त्यान भाडे वाढवण्यास सांगितले. “ठीक आहे, साहेब, आता पार्क स्ट्रीटचे भाडे 900 रुपये होईल. असो तो म्हणाला.
कॅब ड्रायव्हरने वाढवलेले पैसे देण्यासही डस्टिनने नकार दिला. मी फक्त 700 रुपये देईल असे तो म्हणाला. यावेळी एका दुसऱ्या कॅब ड्रायव्हरने डस्टिनला धमकवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील असे त्याने डस्टिनसा सांगितले. माझा थेट “माफिया” शी संबंध आहे. मी तुला दुसऱ्याच जागेवर घेऊन जाईन आणि तुला मारेन, तुझी सगळी हाडं मोडून टाकेन, असे तो म्हणाला. हा सगळा प्रकार डस्टिनच्या कॅमेऱ्याच कैद झाला आहे.
काही वेळाने पैश्यांवरून वाद झाल्याच्यानंतर कॅब ड्रायव्हरने डस्टिनला दुसरी कॅब करण्याचा सल्ला दिला आणि त्याला दुसरी कॅब करून दिली. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ डस्टिनच्या युट्युब चॅनववर आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्य़ा आहेत.




























































