
पोलीस आपले कर्तव्य चोखपणे बजावत असल्यामुळे आपण सुरक्षित वातावरणात राहतो. त्यामुळे पोलिसांप्रति पृतज्ञता म्हणून राज्य शासन त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. पोलिसांच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अचलपूर आणि सरमसपुरा येथील पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय इमारती आणि पोलीस वसाहत, पोलीस ठाण्यांचे लोकार्पण ई-भूमिपूजन दुरस्थ पद्धतीने करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पोलिसांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जनताभिमुख करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोरोनाकाळात पोलिसांनी अभूतपूर्व असे कार्य केले. त्यामुळे पोलिसांसाठी निधीची कमतरता पडू देण्यात येणार नाही. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार राजपुमार पटेल दुरस्थ पद्धतीने उपस्थित होते.

































































