वायनाडमधून राहुल गांधींना पराभूत करू: माकपचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sitaram-yechuri

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधूनही निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. वायनाडमधून राहुल गांधींना पराभूत करू असा निर्धार माकपच्या नेत्यांनी केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पीनाराई विजयन आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे.

राहुल गांधीचा पराभव होणार असे केरळचे मुख्यमंत्री पीनाराई विजयन यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे येचुरी यांनी भाजपला हरवणं हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे.

माकपचे सरचिटणीस येचुरी म्हणाले की, “यंदाची लोकसभा निवडणूक फार महत्त्वाची आहे. देशात धर्मनिरपेक्ष लोकशाही राहणार की नष्ट होणार हे या निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होईल.” तसेच भाजपला हरवणं हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे येचुरी यांनी म्हटले.

राहुल गांधींच्या वायनाड मधून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर येचुरी म्हणाले की, “डाव्या आघाडीविरोधात लढून राहुल गांधी काय संदेश देऊ इच्छितात याचा विचार काँग्रेसने करावा. कोणत्या उमेदवाराने कुठल्या मतदारसंघातून लढावे हा त्या त्या पक्षाच निर्णय आहे.” परंतु यामुळे काय संदेश जाईल हे सुद्धा काँग्रेसने स्पष्ट करण्याची गरज आहे असेही येचुरी यांनी म्हटले.

डाव्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणे म्हणजे काँग्रेस केरळमध्ये डाव्यांना लक्ष्य करत आहे असे येचुरींनी म्हटले. तसेच वायनाडमध्ये राहुल गांधी हरतील यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असेही येचुरी यांनी म्हटले.