
बाॅलिवूडची फिटनेस दिवा म्हणून मलायकाची ओळख ही सर्वज्ञात आहे. ५२ व्या वर्षांतही ती स्वतःला मेटेंन ठेवून आहे. मलायका ही कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत असते. एका मुलाखतीदरम्यान, मलायकाने केलेल्या विधानाने अनेकांचे कान टवकारले आहेत. पुन्हा लग्न करणार का या प्रश्नावर मलायकाने अतिशय जपून उत्तर दिले आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, मलायका अरोराने लग्नाबद्दल आपले मत व्यक्त केले आणि म्हटले की, मुलींनी लवकर लग्न करण्याची घाई करु नये. त्यांनी आधी त्यांचे जीवन जगायला हवे. मलायका म्हणाली, “कृपया इतक्या कमी वयात लग्न करण्याची चूक करू नका. मी लग्न केल्यानंतर अनेक आनंददायी क्षण माझ्या आयुष्यात आले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा आनंदाचा क्षण म्हणजे माझ्या मुलाचा जन्म.. परंतु आधी स्वतःचे आयुष्य उत्तम जगा आणि मगच लग्न करा. लग्नापूर्वी आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा.”
मलायका अरबाज खानपासून घेतलेल्या घटस्पोटाबद्दलही मोकळेपणाने व्यक्त झाली. ती म्हणाली, मला एक मुलगा आहे. मी लग्न या संस्थेवर विश्वास ठेवते, पण याचा अर्थ असा नाही की मीही आता लग्न करायला हवे.. अर्थात तसे आपसुकपणे घडले तर ते उत्तम, पण त्याकरता मी शोध घेणार नाही. आपसूकपणे माझ्या आयुष्यात लग्नाची वेळ आली तर ठिक आहे. मी खूप समाधानी आहे. मी लग्न केले होते, नंतर आम्ही नात्याला पूर्णविराम देऊन आम्ही पुढे गेलो. मी अनेक नात्यांमध्ये आहे, पण मला कंटाळा आलेला नाही. मला अजूनही माझे जीवन आवडते. मला प्रेमाची कल्पना आवडते. मला प्रेम स्वीकारणे आणि एखाद्यावर प्रेम करणे आवडते. मला अशा स्थितीत असणे आवडते जिथे मी एक सुंदर नातेसंबंध जोपासू शकते. म्हणून, मी त्यासाठी पूर्णपणे मोकळी आहे. पण त्याच वेळी, मी ते शोधत नाही. जर लग्नासारखी गोष्ट माझ्या आयुष्यात पुन्हा आली तर मी नक्की ते नाते स्वीकारेन.”
मलायका अरोरा आणि अरबाज खानचा 1998 मध्ये विवाह झाला होता. कालांतराने मतभेदामुळे 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सध्या मलायका सध्या हर्ष मेहताला डेट करत असल्याची चर्चा आहे, तर अरबाज खानने आता शूरा खानशी लग्न केले आहे. हे जोडपे अलीकडेच एका मुलीचे पालक झाले आहे.





























































