सत्ता आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करू, काँग्रेसची मोठी घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मतदारांनी आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा करत आहेत. सत्तेमध्ये आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करू अशी मोठी घोषणा शुक्रवारी काँग्रेसने अल्पसंख्यांक परिषदेत केली.

तिहेरी तलाक कायदा हा मोदी सरकारचे हत्यार असून ते याचा वापर मुसलमान पुरुषांना तुरुंगात टाकण्यासाठी आणि पोलीस स्थानकात उभे करण्यासाठी केला जातो, असा आरोप काँग्रेसने केला. मुसलमान महिलांनाही या कायद्याचा विरोध केला असून काँग्रेसही या कायद्याला कडाडून विरोध करत आहे, असे महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुष्मिता देव यांनी म्हटले. तसेच हा कायदा महिला सशक्तीकरण नाही तर महिला आणि पुरुषांमध्ये विभाजन करणारा आहे, असेही त्या म्हणाल्या.