शेतकर्‍यांसाठी कायदा हातात घेईन – आमदार रायमुलकर

526

निवडणूक धामधुमीत शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे बघता आले नाही, मात्र आता मोकळा असून शेतकरी व जनतेच्या प्रश्नासाठी प्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही असा इशारा महायुतीचे उमेदवार तथा आमदार संजय रायमुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

बुधवारी येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मेहकर मतदार संघात निवडणूक असल्याने शेतकरी व जनतेच्या प्रश्नाकडे बघता आले नाही. मेहकर मतदार संघात दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे आलेली पिके काढता येत नाही. शेतात पाणीच पाणी झाले आहे. शेतकरी चिंतेत आहे. पेनटाकळी धरण भरल्याने विसर्ग सोडण्यात येत असल्याने सुध्दा शेतजमीन व पिके खराब झाली आहे. पावसाने सोयाबीन, कपाशी, तूर, हायब्रीड, शेडनेट, फळबागा, भाजीपालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याचा मतमोजणी नंतर प्रशासनाने सर्व्हे करून मदतीबाबतचा अहवाल पाठवावा अशी मागणी संजय रायमुलकर यांनी केली आहे. मतदार संघातील व शहरातील रस्ते खराब झाले असून दोन दिवसानंतर संबंधित विभागास याबाबत बोलणार आहे. विज वितरण कंपनीच्या कारभारावर सुध्दा त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. जळालेले विद्युत जनित्र 15-15  दिवस बदलून दिल्या जात नाही. कर्मचारी व अधिकारी फोन उचलत नाही. अशा तक्रारी आहेत. कृषी पंप ट्रान्सफॉर्मर बंद झालेले लवकर बदलल्या जात नाही. राष्ट्रीयीकृत बँकाकडून अजूनही काहींना पिक कर्ज मिळाले नाही. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ काही शेतकर्‍यांना मिळाला नाही. अशा विविध समस्या लवकर न सुटल्या तर शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा हातात घेण्याची वेळ आली तर तीही घेऊ असा इशारा सुध्दा त्यांनी दिला।यावेळी उपसभापती बबनराव तुपे, खविसचे उपाध्यक्ष विनोद देशमुख, उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, नगरसेवक रामेश्वर भिसे, विभाग प्रमुख अशोक बोरकर, सचिन जाधव हजर होते. आजच विजयाच्या शुभेच्छा पत्रकार परिषद सुरू असताना मेहकर मतदार संघातील अनेकांनी शिवसेना कार्यालयात येऊन उमेदवार संजय रायमुलकर यांना विजयाच्या शुभेच्छा देऊन आजच अभिनंदन केले व पेढे वाटले.

आपली प्रतिक्रिया द्या