कर्मचाऱ्य़ांकडूनच वाईन शॉप मालकाला लाखो रुपयांचा गंडा, तिघांना अटक

वाईन शॉपमध्ये कामाला असलेल्या तीन कर्मचार्‍यांनी विकलेल्या दारूचे पैसे मालकाच्या खात्यावर जमा न करता लाखो रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी तिघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली.

जगदीश गडघे, धमेंद्र रायकवार  आणि गौतम कनोजिया अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अशोक मुलचंदानी  यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूलचंदानी यांचे विमाननगरमध्ये के. एम. वाईन्सचे दुकान आहे. दुकानामध्ये जगदीश , धर्मेद्र आणि गौतम कामाला आहेत. त्यांनी दुकानातून जानेवारी 2019 ते जुलै 2020 कालावधीतील विक्री केलेल्या दारूचे 12 लाख 29 हजार रूपये मालकाच्या बँकखात्यावर ऑनलाईन वर्ग न करता अपहार केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाने तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या