‘बसण्याचे’ वांदे झाले, वेड्यापिशा झालेल्या बेवड्यांनी दारूसाठी दुकान फोडले

4047

दारुसाठी व्याकूळ झालेल्या तळीरामांनी अखेर दुकान फोडून आपली तलफ भागवण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना आज सांगली आणि मिरज या दोन्ही शहरात उघडकीस आल्या. सांगलीतील संजय नगर येथील एक, मिरजेतील दोन देशी दारूचे दुकान फोडून येथेच्छ दारु प्राशन करत दारूच्या बाटल्या ही लंपास केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे गेल्या आठ दिवसापासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत त्यामुळे तळीरामांची मोठी अडचण झाली होती,दारू मिळविण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या तळीरामांनी अखेर दारूची दुकानेच फोडली आणि तेथेच येथेच्छ आनंद लुटत दारूच्या काही बाटल्या लंपास केल्या, मात्र ही घटना दुकान मालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने नजिकचे पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांनीही तात्काळ काही तळीरामाचा शोध ही घेतला.

सगळीकडे शुकशुकाट आणि संपूर्ण व्यवहार बंद असताना एकाही दुकानात चोरीच्या घटना अथवा फोडाफोडी झाल्याची घटना घडली नाही, मात्र व्यसनाच्या आहारी गेलेल्यां तळीरामांनी दारु दुकान फोडल्याची घटना घडल्याने पोलिसही चक्रावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या