Lockdown – तळीरामाच्या घशाला कोरड, शॉप फोडून वाईनसह 30 हजार रोकड लांबवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुळे सोलापुरातील दावत चौकातील गुलमोहर वाईन शॉप फोडून तळीरामाने ब्रँडेंड वाईनसह 30 हजारांची रोकड लाबंविली आहे.
याप्रकरणी विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सोहेल शेख यांचे जुळे सोलापूरातील दावत चौक येथे वाईन शाॕप आहे. संचारबंदीमुळे सध्या वाईन शॉप बंद आहे. दारुची तलफ झालेल्यां तळीरामाने वाईन शॉप फोडून ब्रँडेंड वाईन बाटल्या तर घेतल्याच शिवाय 30 हजारांची रोकड ही जाता-जाता लाबंविली आहे. रोकडसह 56 हजारांची चोरी झाली असून या प्रकरणी विजापूरनाका पोलिसस्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

संचारबंदीत चोरट्यांनी साधली संधी

संचारबंदीच्या कालावधीत विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. संचारबंदीमुळे घरे बंद असल्याची संधी साधून चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.