विंग कमांडर अशोक मोटे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ख्यातनाम युद्धकथालेखक, निवृत्त वायुदल अधिकारी विंग कमांडर अशोक प्रभाकर मोटे यांचे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता हृदयविकाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार पार पडला. त्यांच्या पश्चात पत्नी भावना, 1 भाऊ व दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.

बांगलादेश तसेच कारगिल युद्धात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. नागपुरात होणाऱया एअरो मॉडेल शोमध्ये त्यांचे समालोचन राहात असे. 16 ऑक्टोबर 1965 रोजी ते वायुदलात रुजू झाले होते. तर 31 मार्च 1993 रोजी ते निवृत्त झाले. हवाई फोटोग्राफीत ते तरबेज होते. वायुदलाच्या कॉलेंडरवर मोटे यांनी काढलेली छायाचित्रे प्रसिद्ध होत असत. एक शैलीदार लेखक म्हणून ते परिचित होते.