
सामना ऑनलाईन । श्रीनगर
पाकिस्तानाच्या हद्दीत जाऊन शत्रुराष्ट्राचे एफ-16 किमान पाडणारे हिंदुस्थानच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी जम्मू-कश्मीरमध्ये आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत स्वागत केले. त्याचबरोबर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी घेत आनंद साजरा केला. तुमच्या कुटुंबासाठी फोटो शेअर करतोय. मला दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार, असे विंग कमांडर अभिनंदन यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.























































