1 / 5
कोड असलेल्या व्यक्तीबाबत आजही लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. मात्र लोकांच्या या मानसिकतेला छेद देत विनी हार्लो या तरुणीने मॉडेलिंग जगतात तिचा ठसा उमटवला आहे.
विनी हिच्या संपूर्ण शरीरावर कोड असले तरी तिच्या शरीरावरील त्या पांढऱ्या डागांसहीत देखील ती सुंदर दिसू शकते हे तिने जगाला दाखवून दिले आहे.
विनीच्या संपूर्ण शरीरावर कोड असून ते आता चेहऱ्यापर्यंत पसरलं आहे. मात्र असे असले तरी ती जगातली एक प्रसिद्ध मॉडेल आहे. मॅाडेलिंगच्या दुनियेत विनीने तिचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे































































