पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; 40 हजारापर्यंत रक्कम काढता येणार

529

रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसीमधून पैसे काढण्याची मर्यादा 40 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. सध्या ही मर्यादा 25 हजार रुपये एवढी होती. पीएमसी बँकेत गैरव्यवहार झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर निर्बंध लादण्याबरोबरच खातेधारकांसाठी बँकेतून ठरावीक रक्कम काढण्याची मर्यादा ठेवली होती. आता ही मर्यादा 40 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याने खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटून पीएमसीच्या खातेधारकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर खातेधारकांच्या हितांचा विचार करून पुढील निर्णय घेतले जातील, असे आश्वासन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी दिल्याचे सीतारमण यांनी सांगितले होते. रिझर्व्ह बँकेने 23 सप्टेंबरला पीएमसीवर निर्बंध लादल्यानंतर तिसऱ्यांदा खातेधारकांना रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे. सुरुवातील ही मर्यादा एक हजार रुपये होती. त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याने 26 सप्टेंबरला ही मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर सध्या ही मर्यादा 25 हजार रुपये एवढी होती. आता ही मर्यादा 40 हजार रुपये करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या