प्रियकराच्या मनात दुसरीची इच्छा! भडकलेल्या महिलेने चाकूने छाटलं गुप्तांग

5665

प्रियकराच्या मनात दुसऱ्या महिलेचे विचार आले आहेत, या संशयावरून एका महिलेने त्याचं गुप्तांग छाटल्याची घटना घडली आहे. फ्लोरिडा येथील मियामी बीचवर हा भयंकर प्रकार घडला.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, एस्परेंझा गोमेझ असं या 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. 13 नोव्हेंबर रोजी मियामी बीचवर ती आणि तिचा प्रियकर दारू पित बसले होते. काही वेळाने तिथे एक तरुणी आली आणि तिने या दोघांसह बसून दारू प्यायची इच्छा व्यक्त केली. दोघांनी तिला होकार दिला आणि काही वेळ ते तिघेही दारू पित बसले. थोड्या वेळाने ती तरुणी तिथून निघून गेली.

तरुणी निघून जाताच दारूच्या नशेत असलेल्या एस्परेंझा हिने प्रियकरावर आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्या तरुणीशी शारीरिक संबंध ठेवायचा त्याचा मानस असल्याचा आरोप तिने केला. संतापाच्या भरात ती त्याच्या छातीवर जाऊन बसली आणि त्याला मारहाण करू लागली. प्रियकराने तिला रोखायचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही. अखेर त्याने पोलिसांना फोन करून तिच्या मारहाणीची माहिती दिली. त्याने फोन केलेला पाहून महिला आणखी संतापली आणि तिने रागाच्या भरात धारदार चाकूने त्याचं गुप्तांग छाटलं.

प्रियकराचा फोन येताच क्षणी पोलीस त्यांच्या दिशेने निघाले होते. सुदैवाने ते वेळेत पोहोचले आणि त्यांनी प्रियकराला रुग्णालयात दाखल केलं. महिलेला यासाठी अटक झाली असून पोलिसांनी चाकूही जप्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या