बीड – घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेवराई तालुक्यातील बोरगाव (बु) येथील घराची भिंत कोसळून त्यामध्ये एक महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री बोरगाव येथे घडली. या दुर्घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी संभाजीनगरला हलवण्यात आले आहे. संततधार पावसामुळे या घराची भिंत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.

बीड जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेमध्ये प्रमिला उत्तम जाधव (45) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर विकास उत्तमराव जाधव (48) आणि छबुबाई विकास जाधव (44) हे दोघे जण गंभीर जखमी झाले. या दोघांना संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान घडली. घराची भिंत पडून प्रमिला जाधव यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त व्यक्त केली जात आहे.