हँसी तो फँसी! जोरात हसल्याने तिचे तोंड उघडेच राहिले

963

हसणं हे आरोग्यासाठी वरदान मानलं जातं. ताणापासून मुक्ततेसाठी मोकळेपणाने हसणं गरजेचं असतं. पण, हेच हसणं वरदानऐवजी अडचण ठरलं तर? असंच काहीसं चीनमधील एका महिलेसोबत घडलं आहे. मोठ्याने हसल्यामुळे या महिलेचा जबडा चक्क उघडाच राहिला आहे.

एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या गुआंगडोंग प्रांतातल्या गुआंगझू येथील रेल्वे स्थानकात ही घटना घडली. गेल्या रविवारी या स्थानकात उभ्या असलेल्या एका ट्रेनमधली महिला प्रवासी जोरात हसली. पण, त्यानंतर तिला आपला जबडा बंद करताच येईना. सुदैवाने तिथे उपस्थित प्रवाशांपैकी एक जण डॉक्टर होता. त्याने तिच्यावर तातडीने उपचार केले. तिचा जबडा डिस्लोकेट झाला होता. त्यामुळे तो बंद करता येत नव्हता. मोठ्या मुश्किलीने दोन प्रयत्नांमध्ये त्या डॉक्टरने महिलेचा जबडा पूर्ववत केला.

या प्रसंगामुळे ती महिला खूप घाबरली होती आणि तिला मदतीची गरज होती. डॉक्टरने तिची मदत केल्यानंतर तिने तिच्यासोबत असं दुसऱ्यांदा घडल्याचं सांगितलं. यापूर्वी गरोदर असताना तिला उलट्यांचा त्रास झाला होता आणि उलट्या करतेवेळीही तिचा जबडा डिस्लोकेट झाला होता, अशी माहिती या महिलेने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या