
पश्चिम आप्रिकेच्या मालीमध्ये एका 25 वर्षीय महिलेने मंगळवारी एकाच वेळी तब्बल नऊ बाळांना जन्म दिला आहे. या महिलेचे नाव हलिमा सिस्से असे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मोरोक्को आणि मालीमध्ये हलिमाचा अल्ट्रासाऊंड केला त्या वेळी डॉक्टरांना केवळ सातच बाळ तिच्या गर्भात आढळले होते.
मालीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने 5 मुलींना आणि 4 मुलांना जन्म दिला आहे. सिझेरियन डिलिक्हरीने बाळांचा जन्म झाला असून महिलेची प्रकृती उत्तम आहे. हलिमा हिला आधी माली देशाची राजधानी असणाऱया बामाकोमधल्या हॉस्पिटलमध्ये दोन आठकडे दाखल केले होते. त्यानंतर 30 मार्चला तिला मोरोक्कोला उपचारासाठी हलवण्यात आले. अखेर मंगळवारी तिची प्रसूती झाली.
जगातील तिसरी घटना
एकाच वेळी नऊ बाळांचा जन्म होणे ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. जगभरातील ही तिसरी घटना आहे. यापूर्की ऑस्ट्रेलिया आणि मलेशियातील महिलांनी एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. मात्र त्यातील काही बाळांनी जन्मानंतर जीव गमावला होता. हलिमाचे नऊ बाळ वाचले तर हा नवा विश्वविक्रम ठरेल.



























































