हडपसर गाडीतळ परिसरात महिलेला मारहाण करीत लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमपीएल बसस्थानक परिसरात दोन महिलांसह तिघांनी प्रवासी महिलेला मारहाण करून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल चोरून नेला. ही घटना १४ सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास गाडीतळ हडपसर परिसरात घडली.

याप्रकरणी रेणुका जाधव (वय 34, रा. तुकाईदर्शन) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका आणि त्यांच्या बहिणाचा मुलगा गाडीतळ परिसरात थांबले होते. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या दोन महिलांसह तिघांना रेणुका यांना विनाकारण शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करीत अडीच हजारांची रोकड आणि चार हजारांचा मोबाइल असा साडेसहा हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले तपास करीत आहेत.

कोथरूडमध्ये घरफोडी, दीड लाखांचे दागिने लंपास

पुणे- बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना 8 ते 15 सप्टेंबरमध्ये कोथरूडमधील इंद्रधनु सोसायटीत घडली. याप्रकरणी महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी महिला कुटुंबीयांसह गावाला गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 1 लाख 53 हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी तपास करीत आहेत.