महिलेचा खून करून मृतदेह पुरणाऱयाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा शहरानजीक वाढे गावातील एका बंगल्याच्या परिसरात पुरून ठेवलेल्या महिलेच्या खुनाच्या गुह्यातील आरोपीला सातारा तालुका पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. विकास हिरामण सकट (वय 38, रा. कलेढोण, ता. खटाव, सध्या रा. फुलेनगर, ता. वाई) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

4 जानेवारी रोजी सातारा तालुका पोलिसांना वाढे गावातील एका बंगल्याच्या पाठीमागे अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटवली असता संबंधित महिलेचे नाव मंगल शिवाजी शिंदे (वय 50, रा. संगम माहुली, ता. सातारा) असे होते. जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू ठेवला होता. संबंधित संशयित आरोपी मोबाईल वापरत नसल्यामुळे पोलिसांच्या हातात येत नव्हता. सातारा तालुका पोलीस वेगवेगळय़ा पथकाद्वारे पुणे, मुंबई तसेच लगतच्या जिह्यामध्ये तपास करीत होते. संशयित विकास सकट हा पुण्यात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पुण्यातून सकट याला अटक केली.